हिंगोली, दि. १२ : भारत सरकार श्रम एव रोजगार मंत्रालयामार्फत नॅशनल करिअर सर्व्हिस (मॉडेल करिअर सेंटर) ची स्थापना करण्यात आली आहे. या सेंटरच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक युवतींना नोकरी मार्गदर्शन, रोजगार मेळावा मार्गदर्शन, Psychometric टेस्टच्या आधारावर करिअर मार्गदर्शन, रोजगार मेळाव्यामध्ये जागेवर निवड संधी, व्यक्तीमत्व विकास
मार्गदर्शन, सुसज्ज आयटी लॅब, स्कील कोर्सेस, टीसीएस आयओएन, Digisaksham, सरकारी तसेच खाजगी कंपनीमध्ये नोकरीची संधी इत्यादी सुविधा शासनामार्फत मोफत पुरविण्यात येणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी केंद्र शासनाच्या www.ncs.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, एस-3, दुसरा मजला, हिंगोली-४३१५१३ (दूरध्वनी
क्रमांक ०२४५६-२२४५७४) भेट द्यावे व नॅशनल करिअर सर्विस श्रम ए रोजगार मंत्रालयाचे यंग प्रोफेशनल नवनाथ टोनपे यांच्याशी संपर्क साधावा, असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.