नांदेड तिरुपती विमान सेवा सुरू.

नांदेड प्रतिनिधी, दि १४ : तिरूपती बालाजी जाण्यासाठी नांदेड – तिरूपती व्हाया हैदराबाद हे नविन विमान सेवा सुरू केली आहे नांदेड शहर हे मुंबई, दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, कोल्हापूर या महानगरांशी विमानाने जोडले आहे. यात आता तिरूपतीची भर पडली आहे. नांदेडहून तिरूपतीकडे जाणाऱ्या भाविकांची थेट विमानसेवेची मागणी अनेक दिवसांपासून होती.  सध्या सुरु असलेल्या विमानसेवेचा विस्तार करत ती आता तिरूपतीपर्यंत वाढविण्यात आली आहे. मंगळवार, बुधवार, गुरूवार या दिवशी हे विमान तिरूपती- हैदराबाद-नांदेड-मुंबई – कोल्हापूर असा प्रवास करून त्याच दिवशी त्याच मार्गाने परतीच्या प्रवासासाठी तिरूपतीकडे निघणार आहे.
सदरील तीन दिवशी सायंकाळी 6.10 मिनिटाला हे विमान नांदेड येथून निघून रात्री 9.10 मिनिटाला ते तिरूपती येथे पोहोचेल. तर तिरूपतीहून याच दिवशी सकाळी 7.05 वाजता तिरूपतीहून निघणारे हे विमान नांदेडला सकाळी 10.25 मिनिटाला पोहचणार आहे. त्यानंतर मुंबई – कोल्हापूरसाठी आकाशात प्रयान करेल आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय झाली आहे. या विमानाचे किमान भाडे 3,999 रुपये आकारण्यात आले असल्याचे कळते. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *