किनवट प्रतिनिधी चंद्रकांत कागणे, दि.१३: किनवटच्या पैनगंगा नदीच्या पात्रात एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत सापडले अज्ञात व्यक्तीची ओळख पटलेली नाही गेल्या काही दिवसांमध्ये किनवट येथे पाऊस जास्त होता आणि त्यामुळे किनवट च्या पैनगंगा नदीला पूर आला त्या पुरात एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत वाहून आले आणि एका नदीतल्या अंजनाच्या छोट्या झाडाला अडकले, नदीत पाणी कमी झाल्यानंतर प्रेत झाडाला झाडाला अडकलेले होते ते प्रेत एका गुराख्याने पाहिले आणि किनवट च्या पोलीस स्टेशन मध्ये फोन वरून सूचना दिली.
किनवट पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच तात्काळ किनवटचे जमदार बाळासाहेब पांढरे आणि त्यांचे सहयोगी पैनगंगा नदी वर पाहणी करण्यासाठी पोहोचले आणि त्या अज्ञात इसमाचे प्रेत पैनगंगा नदीच्या छोट्या अंजनाच्या झाडावरून खाली काढण्यात आले. त्याचे रितसर शवविच्छेदन करण्यात आले, चौकशी दरम्यान अज्ञात इसमाची ओळख अद्याप झालेली नाही, या पुढील तपास किनवटचे जमदार बाळासाहेब पांढरे सर आणि त्यांचे सहयोगी करीत आहेत.