‘कायापालट’ चा तिसऱ्या वर्षी यशस्वी पदार्पण

 

 

नांदेड प्रतिनिधी,दि.३१ :- २५ व्या महिन्यात धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी ३६ भ्रमिस्टांची कटिंग दाढी करून गरम पाण्याने अंघोळ घातल्यानंतर स्वेटरसह नवीन कपडे व शंभर रुपयाची बक्षिसी देऊन कायापालट केला असून या उपक्रमाचे तिसऱ्या वर्षात पदार्पण झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

दर महिन्याला भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे कायापालट नियमित सुरू आहे. यावेळी सुरेश शर्मा,महेश शिंदे, संजयकुमार गायकवाड यांनी शहरातील विविध भागातून स्वतःच्या दुचाकी वर भ्रमिष्ट, कचरा वेचणारे, अपंग, बेघर नागरिकांना बसून आणले. स्वयंसेवक बालाजी कोडके यांनी सर्वांची काळजीपूर्वक कटिंग दाढी केली.

 

 

 

 

 

 

बालाजी मंदिराचे महंत कैलास महाराज वैष्णव यांच्या सहकार्याने हिवाळा असल्यामुळे गरम पाण्याने स्नान करण्याची व्यवस्था करण्यात आली. कित्येक दिवस आंघोळ न करणाऱ्या या नागरिकांना महेंद्र शिंदे व रामशरण चौधरी यांनी साबण लावून अभ्यंग स्नान घातले. यावेळी अंडरपॅन्ट, बनियन व पॅन्ट सोबत स्वेटर देखील मिळाल्यामुळे सर्वजण खुश झाले.

 

 

 

 

 

 

ही भ्रमिष्ट मंडळी कायापालट होण्यासाठी तयार व्हावे म्हणून शंभर रुपयाची बक्षिसी व चहा फराळाची व्यवस्था करण्यात येते.पूर्वीचे मळके कपडे, अवास्तव वाढलेले केस आणि नंतरची चकाचक करण्यात आलेली कटिंग दाढी व नवीन कपडे घातल्यामुळे उपेक्षितांचा झालेला कायापालट पाहून त्यांना स्वतःला नवल वाटले.

 

 

 

 

 

 

 

 

हा अनोखा उपक्रम पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी सदिच्छा भेट दिली.दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी कायापालट हा उपक्रम राबविण्यात येणार असल्यामुळे अशा बेघर व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती द्यावी असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *