देगलूर प्रतिनिधी, दि.०६ :- देगलूर शहरातील सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर श्याम अरुणराव कळसकर हे अल्पावधीत आपल्या स्वकर्तृत्वावर प्रसिद्ध झोतात आलेले नेत्ररोग तज्ञ म्हणून नावारूपास आले आहेत.
त्यांच्या मागे त्यांचे अथक परिश्रम आहेत एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन डॉ. श्याम कळसकर हे बारावी नंतर शासकीय कोट्यातून डॉक्टरी(MBBS) साठी लातूरला गेले तेथून एमबीबीएस पास करून लातूर येथे गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून त्यांनी काम केले त्यानंतर मिरज येथे दीड वर्ष काम केले,
यादरम्यान ते दररोज वीस ते पंचवीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया करत त्यानंतर कोईमतूर व हुबळी येथे अन्य प्रशिक्षण घेऊन ते देगलूर येथे एक वर्ष रुग्णसेवा मंडळ येथे सेवा करून कळसकर आय हॉस्पिटल याची सुरुवात केली दरम्यानच्या काळात वीस हजार शस्त्रक्रिया त्यांच्या हातून यशस्वी पार पडल्या त्यामुळे जनसामान्यात त्यांची एक अतूट नाळ जोडली गेली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर शहरातील व तालुक्यातील त्यांचे आप्त, मित्र, प्रतिष्ठित नागरिक, व जनसामान्यातील जनसामान्य व्यक्ती द्वारा त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सा. महिमा खादीचा सर्व परिवारातर्फे देखील त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
please visit our new portal www.newsrajya.com