देगलूर प्रतिनिधी,दि .०६ :- आज सकाळी साडेसात वाजता तालुक्यातील खानापूर जवळ नांदेड-हैदराबाद राज्यमार्गावर एक स्कुटी ला समोरून येणाऱ्या ट्रक ने धडक दिल्याने स्कुटी चालक विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत मागील सीटवर बसलेला गंभीर जखमी झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील वन्नाळी येथील रहिवासी उमेश नागनाथ विविदवार (१८) हा सकाळी साडेसात वाजता स्कुटी (MH २६ BW४७५०) वरून देगलूर ला खाजगी शिकवणीसाठी जात होता तेव्हा खानापूर जवळ हैद्राबाद हुन सेंटरिंग चे सामान घेऊन नांदेड जाणाऱ्या ट्रक (MH26 BE ९४६३) ने जोरदार टक्कर मारल्याने उमेश हा ट्रक च्या उजव्या टायर खाली येऊन १५ फूट फरफटत गेला त्यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
तर त्याच्यामागे बसलेला श्रीराम संजय पाटिल हा गंभीर जखमी झाला असून त्यालादेगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रक ड्राइवर तिरुपति केरबा सूर्यवंशी हा फरार झाला आहे.
श्रीराम पाटिल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक ड्रायव्हर तिरुपति शेळके याच्या विरुद्ध कलम १७९,३३८,३०४ (अ) भादवी नुसार देगलूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सदरील घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रवि मुंडे करत आहेत. मयत उमेश विविदवार हा अतिशय हुशार विद्यार्थी असून त्याने येथील मानव्य विकास विद्यालयातून इयत्ता १० वी चे शिक्षण घेतले असून इयत्ता १० वी बोर्ड परीक्षेत ९५% गुण मिळवले होते.
यावर्षी त्याने येथील देगलूर महाविद्यालयातुन इयत्ता १२ वी बोर्ड ची परीक्षा दिली होती. उमेश च्या अकाली निधनाने वन्नाळी गावात शोककळा पसरली आहे. आज दुपारी ३ वाजता उमेश च्या पार्थिवावर वन्नाळी येथे अंतिम संस्कार करण्यात आले.
please visit our new portal www.newsrajya.com