मदनुर प्रतिनिधी,दि.०६ :- तेलंगणा व महाराष्ट्र सीमेवरती व मदनुर मंडल येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिर येथे पूर्वीचे मिर्जापूर व हल्लीचे सलाबतपुर येथे प्रति वर्षी प्रमाणे हनुमान जन्मोत्सव २०२३ निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यानिमित्त येथे जत्रेचे आयोजन देखील होते तेलंगणा, आंध्र, महाराष्ट्र व कर्नाटक येथील लाखो हनुमान भाविक या यात्रेत सहभागी होतात या कार्यक्रमाची सुरुवात सात दिवसापासून असते त्याला सप्ताह असे देखील संबोधले जाते.
या सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने होतो यावेळी सप्ताहाच्या काल्याचे किर्तन ह.भ.प शरद महाराज यांच्या कीर्तनाने होणार असल्याचे समजते दिनांक ०७-०४-२०२३ रोजी सकाळी १०:०० ह.भ.प शरद महाराज यांच्या कार्याचे कीर्तनाची सुरुवात होईल याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.