दोन दुचाकींचा समोरासमोर धडक, चार जखमी

 

 

 

हदगाव प्रतिनिधी,दि.११ :- हदगाव ते तामसा रस्त्यावर असलेल्या श्री दत्त महाविद्यालय जवळ काल सकाळी  दोन दुचाकींचा समोरासमोर धडक होऊन चार जण जखमी झाले असून सर्वांना पुढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आले असून जखमी मध्ये हदगाव चा एक मुलगा तर उर्वरित तीन जखमी हरडफचे आहेत त्यामध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

जखमींपैकी एक जण गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर अपघात घडल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिके वरून बराच वेळ तणाव निर्माण झाला होता. सध्या हदगाव शहरात प्रशस्त व चकाचक रस्ते झाले आहेत.

 

 

 

 

तामसा मार्गावर असलेल्या श्री दत्त महाविद्यालय असून या मार्गावर नेहमीच विद्यार्थ्यांचे जाणे-येणे चालू असते त्यातच काल  हदगाव वरून तामसाकडे जाणारी एक दुचाकी व तामसाकडून महाविद्यालय कडे येणाऱ्या एका दुचाकीचा महाविद्यालय जवळ असणाऱ्या मुख्य रस्त्यावर समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात चार जण जखमी झाले आहेत.

 

 

 

 

त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातला एका मुलाच्या डोक्याला जबर मार लागला व दोन मुलींना कंबरला दुखापत झाली असन या सर्वांना पढील उपचारार्थ नांदेडला हलविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *