हिंगोली प्रतिनिधी, दि.२७ :- सन २०२२-२३ या वर्षात हिंगोली जिल्ह्यातील कुस्ती क्रीडा प्रकारातील शालेय व सांगली येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती महिला गट कु. भाग्यश्री दत्ता डुमणे ब्रान्झ पदक प्राप्त, राज्यस्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धा चंद्रपूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत व १९ वर्ष मुले या गटात स्वप्नील सावळे व विजय चव्हाण यांनी ब्रान्झ पदक प्राप्त केले.
या सर्व खेळाडूंचा सत्कार येथील जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी दि. २५ एप्रिल रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथील बहुउद्देशीय हॉल येथे करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे ११०० रुपये भेट देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.