हिंगोली प्रतिनिधी, दि. १८: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या ॲड. संगीता चव्हाण दि. १९ व २० जुलै, २०२३ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
श्रीमती चव्हाण ह्या जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत महिला कामगार यांच्या समस्या व अडीअडचणी जाणून घेणार आहेत. तसेच काही उद्योगांच्या आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथे कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.