मुद्देमाल जप्त , स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची पोलिसाची जबर कार्यवाही
नांदेड प्रतिनिधी,दि.२३:- किनवट पोलीस ठाणे अंतर्गत कंदोरी करत असलेल्या काही इसमांना अज्ञात चोरटयांनी शस्त्राचा धाक दाखवुन जबरी चोरी केली होती. सदर प्रकरणात पोलीस ठाणे किनवट गुरनं. १८४/२०२३ कलम ३९२,३४२,३४ भा. दं. वि. सहकलम ४/२५ शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर प्रकरणातील आरोपीतांचा शोध घेवून अटक करण्याबाबतचे सूचना मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करून आरोपीचा शोध घेणे चालू केले होते.
दरम्यान याच महिन्यातील दि.२१-०७-२०२३ रोजी पोलीस निरीक्षक, स्था. गु. शा. नांदेड यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, पोलीस ठाणे किनवट हद्दीमध्ये जबरी चोरी करणारे आरोपी पैकी काही आरोपी इतवारा, नांदेड परीसरात असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती वरीष्ठांना देवुन
वरीष्ठांच्या आदेशाने स्वतः पुढाकार घेवुन स्थागुशाचे वेगवेगळ्या तिन टिम तयार करुन एक टिम संघर्ष नगर, इतवारा नांदेड येथे दुसरी टिम खडकपुरा, नांदेड व तिसरी टिम गुरुव्दारा परीसरात रवाना करून तिन्ही ठिकाणहुन आरोपी नामे १) सय्यद इम्रान सय्यद इसाक वय २७ वर्ष व्यवसाय बेकार रा. धनेगाव नांदेड ह.मु.
खडकपुरा, नांदेड. २) विकास चंद्रकांत कांबळे वय २० वर्ष रा. पळसा ता हदगाव जि नांदेड ह. मु. धनेगाव नांदेड ३) मुकेश ऊर्फ एम. जे. पि. चंदन जोगदंड वय २३ वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड ४) चंद्रशेखर ऊर्फे चंदु पि देवराव पाईकराव वय २३ वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड ५) प्रशिक ऊर्फ परश्या ऊर्फ रॉनी पि. दिलीप ओढणे वय २४ वर्ष रा. संघसेननगर, इतवारा नांदेड ६) ज्ञानेश्वर ऊर्फ डॅनी
पि. अनिरुद्र गाडगे वय २२ वर्ष रा. सेलगाव ता अर्धापुर जि नांदेड ७) सय्यद सोहेल पि सय्यद नुर वय २१ वर्ष रा. खुदबेनगर चौरस्ता नांदेड ८) शेख मुबीन शेख गौस वय २१ वर्ष रा खुदवेनगर चौरस्ता, नांदेड ९) वैभव शिवराम गुरव वय २२ वर्ष रा. व्यंकटेश नगर, नांदेड १०) अंशुमनसिंघ राजेंद्रसिंघ मिलवाले वय १८ वर्ष रा. गुरुव्दारा गेट नंबर ५ नांदेड ११) सिताराम उत्तम काळे वय २५ वर्ष रा पळसा वा
हदगाव जि नांदेड १२) एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन पो. स्टे. किनवट हद्दीतील जबरी चोरी बाबत विचारपुस करता, त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेले ०२ पिस्टल (अग्नीशस्त) ०१ जिवंत काडतूस,
०१ एअरगण, ०१ तलवार, ०२ खंजर, ०३ मोटार सायकल व गुन्हपातील जबरी चोरी केलेले नगदी १,२५००० /- रुपये जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीना पुढील तपासासाठी पो स्टे किनवट येथे देण्यात आले आहे.
स्थागुशा, नांदेड कडून ०२ पिस्टल (अग्नीशस्त्र). ०१ जिवंत काडतुस, ०१ एअरगण, ०१ तलवार, ०२ खंजर, ०८ मोटार सायकल व नगदी १,२५००० /- रुपये असा एकुण ५,९५००० /- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अविनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक, नांदड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री व्दारकादास चिखलीकर, पो. नि. स्थागुशा नांदेड, सपोनि / पांडुरंग माने, पोउपनि / दत्तात्रय काळे, सचिन
सोनवणे, अशिष बोराटे, जसवंतसिंघ शाहू, माधव केंद्रे, गंगाधर कदम, मोतीराम पवार, गणेश धुमाळ, विलास कदम, रणधिर राजवंशी, विठ्ठल शेळके, हेमंत बिचकेवार, शंकर केंद्रे, राठोड, सुरेश घुगे, संग्राम केंद्रे, संजीव जिंकलवाड, बालाजी तेलंग, किशन मुळे, दिपक पवार सायबर सेल येथील पोउपनि / गजाजन दळवी, राजु सिटीकर, दिपक ओढणे यांनी पार पाडली आहे. स्था. गु. शा. चे अधिकारी व अमंलदार यांचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
