फेक न्यूज ची माहिती देण्यासाठी नागरिकांना आवाहन

बीड, दि.३१ :-  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कालावधीमध्ये ३९ बीड मतदारसंघातील ‘फेक न्यूज’ची माहिती देण्यासाठी८७८८९९८४९९ हा स्वतंत्र क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांनी यावर फेक न्युज ची माहिती व्हॉट्सअप करावी.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून आचारसंहिता लागू झाली आहे. याकाळात उमेदवारांची प्रचारा दरम्यान बदनामी करणे, अफवा पसरविणे, द्वेषपुर्ण संदेश, खोटे संदेश तसेच प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेकन्युजची माहिती  नागरीकांकडून मिळण्यासाठी हा

 

 

 

 

 

 

८७८८९९८४९९  स्वतंत्र मोबाईल क्रमांक माध्यम प्रमाणिकरण व संनियत्रन समिती आणि  मीडिया कक्षाकडून जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर व्हॉट्सअप करावे.

 

 

 

 

 

८७८८९९८४९९ या क्रमांकावर  नागरीकांकडून मिळालेल्या माहितीची नियंत्रण कक्षाकडून तसेच बीड सायबर पोलीस यांच्या मदतीने शहानिशा करुन आवश्यक  कारवाई करावी करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *