बालाजी मैलागिरे यांची मुरूम टाकण्याची मागणी.

 

 

देगलूर प्रतिनिधी, दि.०७:- देगलूर येथील प्रभाग क्र १ मधील रस्त्यांची दैनीय अवस्था झालेली आहे पाऊसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे .

 

 

प्रभाग क्र १ मध्ये पाऊसामुळे खूप चिखल होत आहे चिखला मुळे व घाणी मुळे तेथील रहिवाश्याचा जीव धोक्यात आहे तेथील रहिवाशी हे घाणी मुळे डेंगू ,ताप विविध आजाराला त्यांना सामोरे जावे लागत आहे तेथील रहिवाश्याच्या लोकांमध्ये आरोग्याची भीती निर्माण झालेली आहे म्हणून देगलूर येथील शिवसेनेचे शहर प्रमुख बालाजी मैलागिरे यांनी एका निवेदनाद्वारे नगर परिषदेकडे मागणी केली आहे प्रभाग क्रमांक १ मध्ये चिखल व घाण आहे त्या रस्त्यावर मुरूम टाकावे अशी त्यांची मागणी आहे.