नांदेड दि. १५ डिसेंबर : १६-नांदेड लोकसभा पोट निवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ निवडणूक खर्च संनियंत्रणाच्या अनुषंगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचे लेखे विहित मुदतीत दाखल करणे सोयीचे
होण्यासाठी उमेदवारांसाठी/खर्च प्रतिनिधींसाठी तसेच निवडणूक खर्च स्विकारणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी सुविधा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण उद्या
सोमवार १६ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत कै. डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह, नियोजन भवन, पहिला मजला, जिल्हाधिकारी परिसर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे.