मराठी ग्रंथ संग्रहालय त्रेवार्शिक निवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

 

हैदराबाद प्रतिनिधी,दि.१९:- हैदराबाद येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात त्रेवार्शिक नव्या कार्यकारिणी आणि विश्वस्त मंडळाच्या निवडणुका अत्यंत शिस्तबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. निवडणुकीचे संपूर्ण श्रेय

 

निवडणूक अधिकारी सौ. छाया काळे तसेच त्यांचे सहायक सौ. सीमा आणि सौ. दीप्ती सलगरकर यांना दिले जात आहे. त्यांनी प्रारंभापासून शेवटपर्यंत अत्यंत कुशलतेने जबाबदारी पार पाडली.

 

 

निवडणूक प्रक्रियेत मदतनिस रचना मॅडम व ज्योती मॅडम यांची धावपळ उल्लेखनीय ठरली, तर रसिका हिने संगणकाच्या साहाय्याने हसतमुखाने काम करून विशेष कौतुकास पात्र ठरली.

 

 

निवडणुकीदरम्यान प्रभाकर कोरडे यांनी मतदारांसाठी चहा, कॉफी व बिस्कीटांची उत्तम व्यवस्था केली. मल्लिका यांनी सतत हसतमुखाने चहा वाटप केले. तसेच स्वादिष्ट जेवणाची जबाबदारी विवेक देशपांडे सर यांनी वेळेवर पूर्ण करून मोलाचा वाटा उचलला.

 

 

अखेर, निवडणूक अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. पावसाची धास्ती असतानाही वरुणराजाने साथ दिली. सर्वांच्या सहकार्यामुळे ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्याचे आयोजकांनी सांगितले.

मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद कार्यकारिणी 2025 ते 2028 खालीलप्रमाणे आहे

*विश्वस्त मंडळ सभासद*

1. Dr विद्या देवधर

2. श्रीमती शुभांगी परळीकर

*नवनिर्वाचित*

3. श्री प्रभाकर कोरडे

4. Dr नयना जोशी

*पदाधिकारी*

*अध्यक्ष*

श्री विवेक देशपांडे

*उपाध्यक्ष.*

सौ. मंगलाताई पळनीटकर

*कार्यवाह*

श्री सतीश देशपांडे

*कोषाध्यक्ष*

श्री माधव रामराजे चौसाळकर

*कार्यकारिणी सभासद*

1. श्री विवेक अभ्यंकर

2. श्री गिरीश मोंडकर

3. Dr शैलजा जोशी

4. सौ. मृणाल सहस्रबुद्धे

5. श्री विजय नाईक

6. श्री यशवंत घारापुरीकर

7. कु. योगिनी फळणीकर

8. श्री श्रीकांत आठवले

9. सौ. अंजली पळनीटकर

10. सौ अल्पना नांदेडकर