तहलका न्यूज महाराष्ट्र राज्य व बिहुमन्स वेल्फेअर फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गौरव बिडकर यांच्या हस्ते सत्कार.
नांदेड प्रतिनिधी : महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक यांच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख आरिफ निमटेककर यांचा पुष्पहार व शाल अर्पण करून सन्मान करण्यात आला. तहलका न्यूज महाराष्ट्र राज्य आणि बिहुमन्स वेल्फेअर फाउंडेशन, हैदराबाद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार आयोजित करण्यात आला. बिहुमन्स वेल्फेअर फाउंडेशनचे संचालक गौरव बिडकर यांच्या हस्ते शेख आरिफ यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेत वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक कार्याला प्रोत्साहन देणे आणि समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हा या सोहळ्याचा उद्देश होता.
याप्रसंगी तहलका न्यूजचे महाराष्ट्र स्टेट इन्चार्ज गजानन बिडकर, माधुरी बिडकर, ज्येष्ठ पत्रकार बजरंग सिंह हजारी, विजय हजारी, प्रेमसिंग चव्हाण तसेच उमरी येथील प्रतिष्ठित पत्रकार आणि विविध क्षेत्रांतील सर्व सत्कारमूर्ती उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेख आरिफ यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सेवाभावी संस्थांनी सातत्याने कार्यरत राहून विविध उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
