मुखेड प्रतिनिधी दि. १८ : मुखेड पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान पाहिले असता केलेल्या कार्याची दखल घेऊन राज्यातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा पत्रकारांचा बहुउद्देशीय संघ भारत सरकारचा मान्यता प्राप्त (राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ यासाठी मुखेड तालुका अध्यक्ष म्हणून ज्ञानेश्वर अर्जुनराव कागणे रा हिब्बट ता मुखेड जि नांदेड यांची निवड झाली आहे. ही निवड मराठवाडा प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर मुंढे यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली. या निवडीसाठी श्री हरेंद्र उर्फ संतोष निकम राष्ट्रीय अध्यक्ष श्री वैभव पाटील महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री डॉ राजेंद्र साळुंके महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री रमेश राजाराम देसाई महाराष्ट्र प्रदेश महासचिव या पदाधिकाऱ्यांनी निवड केली.