किनवट प्रतिनिधी सी एस कागणे.
किनवट,दि.२९ ( एस.टी .महामंडळास शासनात विलीन करून घ्यावे , राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता देण्यात यावा , वार्षिक वेतन वाढीचा दर तीन टक्के द्यावा, दरमहा वेतन निर्धारीत वेळेत व्हावे तसेच थकीत वेतन दिवाळीपुर्वी द्यावे या मुख्य मागणी सह इतर मागण्या मान्य करून राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचार्यास न्याय द्यावा या मागणी साठी दिनांक २८ ऑक्टोबर रोजी किनवट आगाराच्या गेटसमोर रा.प. किनवट आगाराच्या कृतीसमिती चे कर्मचारी अमरण उपोषणास बसले आहेत .
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना शासन कर्मचार्यात विलीन करून घ्यावे ,थकीत व प्रलंबीत महागाई भत्ता, वार्षीक वेतन वाढीचा दर ३%, घरभाडे भत्ता दर ८, १६, २४ हा शासनाकडून मान्य केल्यानुसार द्यावा, मासिक वेतन नियमीत व निर्धारीत वेळेतच अदा करण्यात यावे. शिवाय थकीत वेतनही दिवाळी पुर्वी देऊन दिवाळी साजरी करावी. अशा ज्वलंत मागण्या घेऊन २८ आॅक्टोबर रोजी किनवट आगारा समोर संयुक्त कृती समितीच्या वतीने अमरण उपोषण करण्यात आले . सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या.तालुक्याच्या ठिकाणी राहून नौकरी करायची म्हणजे आमची अर्थिक तडजोड करण्यासाठी आम्हाला तारेवरची कसरत करावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी दोन रुमचे घरभाड्याने घेऊन राहायचे झाल्यास ६ हजार रुपये भाडे द्यावे लागते किराणा , दुध , भाजीपाला, मुलांचे शिक्षण , कपडे , दवाखाना आम्ही १२ हजार किंवा १५ हजारात कसा सर्व खर्च भागवावा ही मोठी समस्या आम्हाला प्रत्येक महिण्यात भेडसावते, याचा तानतनाव आमच्यावर असतो त्यामुळे आमचे कर्मचारी आत्महत्याचा मार्ग अवलंबीत आहेत . आज पर्यंत अंदाजे २६ कर्मचाऱ्यानी आत्महत्या केल्या आहेत . या सर्व बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करून आमच्या सर्व मागण्या मान्य करून आम्हा कर्मचाऱ्याना न्याय मिळवून द्यावा . या पुढे कर्मचार्याच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्यात असे उपोषणास बसलेल्या कर्मचार्यानी व्यथा मांडत आम्ही आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत अमरण उपोषण करणार असल्याचे सांगत अनेक मागणीचे निवेदन आगार प्रमुख रा . प . किनवट यांच्या कडे देवून २८ ऑक्टोबर पासुन अमरण उपोषणास बसले आहेत .
वरील सर्व मागण्या मागणाऱ्या निवेदनावर महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटना अध्यक्ष आर.आर.नेम्मानिवार, सचिव डी.जी.कोंडे, राष्ट्रीय एस.टी.कामगार काँग्रेस एन.बी.आंगरवार, सचिव जी.आर.सटलावार, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स (इंटक) एस.ए.सोनकांबळे, सचिव एस.एन.महादळे, महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनाध्यक्ष जी.एस.चंद्रे, सचिव जी.व्ही.दासरवार, कास्ट्राईब रा.प.कर्मचारी संघटनाध्याक्ष एस.डी.वाघमारे, सचिव शिषीर चव्हाण यांच्या सह अनेक कर्मचार्या च्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आगार प्रमुखांना दिले आहे. शासनाने एस टी महामंडळ कर्मचा-यांच्या मागण्या लवकर मान्य केल्या नाहीतर या राज्यव्यापी आंदोलनाचा मोठा फटका प्रवाशांना व महामंडळाच्या तिजोरीला बसणार आहे.