सांस्कृतिक प्रकोष्ठ तर्फे लघुपट स्पर्धा आयोजन – संयोजक शैलेश गोजमगुंडे

 

नांदेड प्रतिनिधी,दि.१६ : भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व संपन्न कारकीर्दीवर आधारीत “कर्मयोगी नमो” या लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा सांस्कृतिक  प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशचे संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली आहे.

भाजपाच्या “सेवा आणि समर्पण” अभियानांतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “कर्मयोगी नमो!” ही लघुपट स्पर्धा मा. नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर आधारीत असेल. एक मिनिट ते बारा मिनिटांच्या लघुपटासाठी भाषेचे बंधन नाही. या स्पर्धेसाठी प्रथम रु.७५ हजार,द्वितीय  रु.५१ हजार  तृतीय रु. ३१ हजार तर पाच उत्तेजनार्थ प्रत्येकी रु.१५ हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरुप आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी माहिती दिली आहे…

“कर्मयोगी नमो!” लघुपट स्पर्धा विनाशुल्क असून अधिक माहितीसाठी namokarmayogi@gmail.com या इमेलवर तसेच प्रदेश सहसंयोजक वीरभद्र स्वामी,मराठवाडा विभाग संयोजक ॲड.निनाद खोचे,सहसंयोजक गजानन जोशी,सौ.अपर्णा चितळे यांनी दिलेल्या 9673962117 या व्हाट्स ॲपवर संपर्क साधावा,असे आवाहन भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठनं केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *