मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली

मुंबई प्रतिनिधी, दि. १७:- सहज सोप्या, उडत्या चालींच्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मनस्वी, निखळ असा गायक, संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने काळाने हिरावून नेला आहे. ते संगीत क्षेत्रातील आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमुळे अजरामर राहतील अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, बप्पी लहरी यांनी तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील अशा गाण्यांनी आपली वेगळी शैली रूढ केली. त्यांच्यामध्ये गायक आणि संगीतकार असा उत्कृष्ट मिलाफ होता. त्यामुळे त्यांचा असा एक चाहतावर्ग निर्माण झाला. त्यांनी काही धीरगंभीर संगीतरचनाही दिल्या. संगीत क्षेत्रातील जुन्या-नव्या प्रवाहातही त्यांनी आपली शैली जपत संगीत दिले. चित्रपट सृष्टीला या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची उणीव जाणवत राहील. ते आपल्या विशिष्ट शैलीमुळे आणि गाणी, संगीतामुळे अजरामर राहतील. ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *