दंतुलवर सोपान मदनूर प्रतिनिधी दि.२१ :
सलाबतपूरमध्ये आर्थिक अडचणीमुळे एका विवाहित व्यकतीने गळफास लावून आत्महत्या केली. . कामरेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळाचे रहिवासी सलाबतपूर (मिर्झापुर) गाव आहे
सलाबतपूर उत्पादन शुल्क चेकपोस्ट जवळ एक गरीब विवाहित शेतकरी विठ्ठल पांचाळ वय ३८ वर्ष सततची नापिकी व कर्जाला कंटाळून जुन्या घरात गळफास लावून आत्महत्या केली दरवर्षी बियाणे, खत, हर्बल औषध, मजुरांचा होनारा खर्च हे मिळकती पेक्षा अधिक होते पीक बिघडल्यामुळे आणि अधिक कर्जाच्या बोजामुळे त्याने मद्यपान सुरू केले. दारू पिणे व त्याचे कुटुंब चालवणे आर्थिक अडचणीमुळे त्रस्त झाले होते, याच अनुषंगाने रात्री उशिरा रात्री त्याने या घरात गळफास लावून आत्महत्या केली, मदनूर पोलिसांना याची खबर मिळताच पोलिसांनी पोलिस घटनास्थळी येऊन माहिती घेतली. गुन्हा नोंदवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मदनूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविला गेला, अशी माहिती मदनूर एस.आय. राजू यांनी दिली आहे.