नांदेड प्रतिनिधी, दि.२९ :- नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत १६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक-२०२२ साठी अंतीम प्रभाग रचनेचे प्रस्ताव मान्यतेसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते. या प्रस्तावास विभागीय आायुक्त औरंगाबाद यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.
त्यासंदर्भातील अंतीम प्रभाग रचनेची अधिसूचना जिल्हा व तालुका मुख्यालयी २७ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.