नांदेड जिल्ह्यात १३ व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड  दि. २१ :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या १२४ अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा ५, नांदेड ग्रामीण २, तर ॲटीजन तपासणीद्वारे माहूर ६ असे एकूण १३ अहवाल कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या १ लाख ३ हजार ५० एवढी झाली असून यातील १ लाख २९९ रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ५९ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या २ हजार ६९२ एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरणात १  व नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गंत गृह विलगीकरणातील १ असे एकूण २ रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण २३, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील ३१, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ४, अश्विनी हॉस्पिटल १ असे एकुण ५९ व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *