फाळणीतील वेदना अधोरेखित करणाऱ्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ

.१५ ऑगस्टपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले

नांदेड  दि. १५ :- देशाच्या फाळणीमुळे लाखो लोकांनी झेललेले दु:ख, यातना या न विसरता येणाऱ्या आहेत. अनेकांनी यात बलिदान दिले. त्या ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींच्या स्मृती प्रित्यर्थ काल १४ ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस पाळण्यात आला. फाळणीतील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्र व त्यासंदर्भातील माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचावी या उद्देशाने खास तयार करण्यात आलेल्या चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ आज करण्यात आला.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसपत्नी व मान्यवरांच्या हस्ते या प्रदर्शनीचे प्रातिनिधीक उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या सभागृहात करण्यात आले.  यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली मोतियाळे, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस पत्नी सुमन त्रिंबकराव कुलकर्णी, सिंधुबाई गगनराव देशमूख, कस्तुराबाई श्रीकिशन पारीख, यमुनाबाई मारोती कुरुडे, सुंदराबाई मारोतराव देशमुख, प्रभावती दत्तात्रय टेळकीकर, साधनाबाई रामराव पांडे, कुमुदिनी राहेगावकर, प्रेमलाबाई रामराव अंबुलगेकर यांना शाल श्रीफळ देवून गौरव केला. हे प्रदर्शन दोन दिवस खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *