एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय

मुंबई, दि. १८ : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

 

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचएमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल.

 

याउमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *