नांदेड जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने पुरोगामी पत्रकार संघात सामील.

जेष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे व दै.शासनमान्य चे संपादक संजयभाऊ निळेकर यांची पद नियुक्ती.

नांदेड:-(प्रतिनिधी) दि.०६:-  संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावशाली होत असलेला पत्रकार संघ, “हथियार और औजार अपने पास ही रखे जनाब, हम तो वो जमात है, जो खंजर से नही, कलम से वार करते है” या तत्त्वावर चालणारा पत्रकार संघ, सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात पत्रकार संघाची चळवळ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

 

पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व सामान्य जनतेच्या अनेक मागण्या संदर्भात संघर्ष मय लढा उभारून तळागाळातील लोकांपर्यंत पोहचत त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा गाव विकास समितीचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल,महाराष्ट्र उत्तर कार्याध्यक्ष आशिक अली यांनी नांदेड जिल्ह्यातील पत्रकारांची दि.०५ सप्टेंबर २०२२ रोजी भेट घेतली.सर्व पदाधिकाऱ्यांना पुरोगामी पत्रकार संघाची माहिती सांगण्यात आली, संघाची यशस्वीपणे वाटचाल संदर्भात चर्चा करण्यात आली व सर्वांना पदनियुक्त करण्यात आले.

 

 

 

आजच्या या बैठकीत काही नियुक्त्या ही करण्यात आल्या.रवींद्र जोंधळे यांची मराठवाडा विभागीय सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.तर संजय निळेकर यांची नियुक्ती करण्यात आली.दोघांचेही सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी अशोकदादा वायवळ (मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष), शंकर सिंह ठाकुर (नांदेड जिल्हा अध्यक्ष), मारोती बिजले (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष), मारोती शिकारे (नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष), मोहम्मद इलियास (कायदेशीर सल्लागार), सय्यद आरिफ (पुरोगामी सदस्य) हे उपस्थित होते. राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आशिक अली यांचा सत्कार करण्यात आला व बागुल यांनी सर्वांना पुढील कामास शुभेच्छा दिल्या शेवटी बैठकीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

 

 

नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे व दैनिक शासन मान्यचे मुख्य संपादक संजय भाऊ निळेकर या दोघांची राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात पद नियुक्ती झाल्याबद्दल मित्र परिवारातून आनंद व्यक्त केला जात आहे व त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव सतत त्यांच्यावर चालू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *