बिलोली प्रतिनिधी, दि.०९:- तालुक्यातील रामतीर्थ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मौजे भोपळा येथे एका तलावात श्रीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की मंडळाच्या पदाधिकारी व गावातील गणेश भक्त श्री चे विसर्जन केल्यानंतर घरी परतत असताना काही मुले त्याच तळ्यात पोहण्यासाठी उतरत होते व पोहच सुद्धा होते .
त्यात वीस ते बावीस वर्षे तरुण राजेश बाबुराव हत्तीनगरे हा देखील पोहण्यासाठी उतरला पण तळ्या मधल्या गाळामध्ये अडकून त्या तरुणाचा मृत्यू झाला असल्याची दुःखद घटना घडली असल्याचे रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक संकेत दिघे यांनी आमच्या संवाद दाताशी बोलताना सांगितले आहे.
या तरुणाच्या मृत्यूमुळे पंचक्रोशीत दुःखाचे सावट पसरले आहे.