लोकजीवनातील सौंदर्याचे , जीवनातील बारकावे साहित्य जगतात उजागर करून मराठी साहित्य समृद्ध केले. कथा कादंबरी कविता लावणी पोवाडे इत्यादी लेखनातून समाजाचे भावविश्व अतिशय बोलके आणि अलंकारिक वास्तव सोंदर्या चित्रण केले आहे. फकिरा, वैजयंता, चित्रा , वारणेचा वाघ स्मशानातील सोनं , बरबद्या इत्यादी साहित्य कृती मराठी साहित्यातील वैभव आहे. रंगभूमीला समृद्ध करण्याची ताकद अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात प्रकर्षाने दिसते. लोकजीवन व लोकजीवनातील परिस्थिती आणि त्यातील बारकावे अत्यंत कलात्मक रूपाने साहित्यात मांडले आहेत. हे त्यांच्या साहित्याचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास संघर्षशिल राहिला आहे. सहित्याबरोबर कामगार चळवळीला आपले सर्वस्व अर्पण केले. साहित्यिक , लोककलावंत , शाहीर म्हणून ते जगविख्यात आहेत. जीवनाच्या प्रारंभापासून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत त्यांनी आपले अत्युच्च स्थान निर्माण केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी रावबा गजमल यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कथांचे सर्जनात्मक रूपाने अप्रतिम सादरीकरण केले. स्मशानातील सोनं , बरबाद्या , इत्यादी अनेक कथेला रावबा गाजमल यांनी कलात्मक रीतीने रंगमंचीय अवकाशात सादरिकरण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आणि त्या सर्जक कलाकृतीचे देशात व महाराष्ट्रातल्या मुंबई पुणे औरंगाबाद सहित कानाकोपऱ्यात प्रयोगाचे सादरीकरण केले. त्यामुळे एक समृद्ध रंगकर्मींची फळी निर्माण झाली. रावण गाजमाल यांनी कथेतले बोलके दृश्य उभे करून कथेतील परिणामकारकता नाट्यमय पद्धतीने वेगळ्या रूपाने सादर केली.
प्रा. कैलास निवृत्ती पूपुलवाड
9922652205
याच बरोबर नांदेडचा तरुण लेखक दिग्दर्शक राहुल जोंधळे यांनी अण्णाभाऊंच्या जीवन वरित्रात्मक. ” मृत्युकडून जीवनाकडे” ही महत्त्वपूर्ण नाट्य निर्मिती केली .

त्यामध्ये अण्णाभाऊं साठे यांचे चरीत्र अत्यंत बेमालूमपणे उभे केले हे त्यांचं विशेष कौतुक आहे.
अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य सर्जनात्मक कलात्मकतेने प्रेक्षकांच्या समोर उभे करण्याचा प्रायोगिक हव्यास रंगभूमीला समृद्ध करू शकतो. त्यांच्या साहित्यात नाट्य गुण खाच्चून भरले आहेत. घटनेच्या वर्णनात आणि पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यात अत्यंत बारकाईने वर्णन आहे की वाचकांच्या डोळ्यासमोर ती ती पात्र प्रभावीपणे उभी राहतात. फकिरा मधील फकिरा, स्मशानातलं सोनं मधील नायक , बरबाद्या मधील बरबाद्यां. चित्रा, वैजयंता, इत्यादी सर्वच पात्रे बोलकी आहेत. आणि त्यांच्या सहित्यातली कथा , घटना, पात्र , ह्यामध्ये रंगभूमीला समृद्ध करण्याची ताकद आहे. त्याचबरोबर वास्तवाचं चित्रण त्यांच्या लिखाणाचं अत्यंत महत्वाचं एक वैशिष्ट्ये आणि मूळ धागा आहे.
लेखकाला आपला भोवताल वाचता आला पाहिजे कारण त्यातून सर्जनात्मक कलाकृती निर्माण होऊ शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे होत. अण्णाभाऊ साठे यांचे निरीक्षणाची मांडणी वस्तावाईतकीच प्रभावी आहे. नाट्य गुण आणि रंगमंचीय अवकाशात अण्णाभाऊ यांच्या साहित्यात रंगभूमीला समृद्ध करण्याची प्रचंड ताकद आहे. त्या दिशेने केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील नाट्य कलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय, खाजगी संस्थांनी अण्णा भाऊ यांचे साहित्य नाट्य कलेच्या रंगमंचीय अवकाशात सादरीकरणासाठी घ्यावे आणि एका जागतिक कीर्तीच्या साहित्यिकाच्या गौरवाबरोबर त्यातील नाट्य तत्वांना व तत्कालीन परिस्थितीला समकालीन वास्तवाशी जोड द्यावी जेणेकरून दोन प्रभावी गोष्टी घडून येऊ शकतील एका अर्थाने एका भारतीय साहित्यिकाच्या गौरव होईल आणि नाट्य कला विश्वात भर पडेल. अण्णाभाऊंच्या साहित्यातील नाट्य गुण एकूणच रंगभूमीला प्रशस्त आणि प्रभावी करण्याचे बळ देऊ शकते. म्हणून अण्णाभाऊ यांच्या साहित्यात रंगभूमीला समृद्ध करण्याची ताकद आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. यासाठी तरुण रंगकर्मी नाट्य- प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय , खाजगी नाट्य संस्थांना आव्हान आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यावर आधारित नाट्यकला विश्वात वेगवेगळे प्रयोग व्हावे हे अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म दिनाचे औचित्य साकार होवो ही अपेक्षा करतो.


