सोपान दंतूलवाड मदनुर प्रतिनिधी : मदनूरमध्ये लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली. . कामारेड्डी जिल्ह्यातील मदनूर मंडळ परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे प्रमुख पाहुणे यांनी या वेळी प्रार्थना केली. यावेळी स्थानिक सरपंच दर्शवार सुरेश आणि टीआरएस पक्षाचे अध्यक्ष संगमेश्वर मदनूर बाजार समितीचे अध्यक्ष सयागोड एम. लक्ष्मीबाई आणि झेड .पी.टी.सी. खुशाल, पोलावर प्रभाकर, करेवार बालाजी, अशोक इत्यादी विविध गावातील महिला व पुरुष यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते, आमदार व इतरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरणावर आपले विचार व्यक्त केले.