देगलूर प्रतिनिधी,दि.०२ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे दिनांक ३० एप्रिल २०२३ रोज़ी पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकड़ून महाराष्ट्र अराजपत्रित अधिकारी गट ब व गट क अशी संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
प्रस्तुत परीक्षा एकूण ४८० विद्यार्थी वर्गासाठी आयोजित करण्यात आली होती. परीक्षा केंद्र यशस्वी करण्यासाठी देगलूरचे नायब तहसीलदार अंगद नेटके,नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, सौ. उषा कदम, प्रा. डॉ. बी. आर. कतुरवार प्रा. डॉ. ए. बी चिद्रावार, प्रा. डॉ आर. बी. लक्षट्टे डॉ. सचिन कोंडेकर , किशन पांचाळ , दत्त प्रसन्न साखरे यांच्यासह देगलूर महाविद्यालय व मानव्य विकास विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले अशी माहिती प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ यांनी दिली आहे.