हैदराबाद प्रतिनिधी,दि.०२ :- हैदराबाद येथील रामअंतापुर भागात राहणारे प्रदीप मनोहरराव गुर्णाळे यांचे दिनांक ०१-०५-२०२३ रोजी मध्यरात्री १:०० सुमारास अकस्मात निधन झाले. मृत्यू समयी ते फक्त ४३ वर्षाचे होते.
मूळचे ते कर्नाटक येथील भालकी तालुक्यातील (मेथीमेळकुंदा) येथील असून मागील अनेक वर्षापासून हैदराबाद येथेच वास्तव्यात होते. प्रदीप गुर्णाळे हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे मनमिळावू व सेवाभावी वृत्तीचे असल्यामुळे, त्यांच्या अश्या अकाली निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात त्यांची आई, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.