देगलूर प्रतिनिधी दि ०६ :-अडत व्यापारी शिक्षण संस्था संचालित देगलूर महाविद्यालयातील प्लेसमेंट विभाग व महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०४ /०७ /२०२३ रोजी एकदिवसीय रोजगाराच्या संधी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन खताळ हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
त्यांनी नवीन शैक्षणीक धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण व संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड चे राजा एन., निलेश भोसले, पवनकुमार सिंग हे उपस्थित होते.
या वेळी राजा एन व निलेश भोसले यांनी महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड ची भुमिका, कार्यप्रणाली व रोजगाराच्या संधी याबाबतची सविस्तर माहिती दिली.
या कार्यशाळेस पदवी व पदव्युत्तर वर्गाचे ७० विद्यार्थी उपस्थित होते. त्यांची बहुपर्यायी स्वरूपाची २० गुणाची परीक्षा घेण्यात आली.
तसेच या विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली. या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ रत्नाकर लक्षटे यांनी केले. आभार डॉ. सुरेश काशिदे यांनी मानले . या कार्यशाळेचे सूत्रसंचलन डॉ. संजय देबडे यांनी केले.
प्रस्तुत कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी समन्वयक डॉ रत्नाकर लक्षटे, डॉ संजय देबडे, डॉ सुरेश कशिदे,डॉ. राजकुमार पोकलवार, किशन पांचाळ, गंगाधर मामिडवार, शाम कळसकर यांनी परिश्रम घेतले.