देगलूर दि ०६ :येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व लक्षात घेता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे .
केंद्राचे उद्घाटन दिनांक ६जुलै२०२३ रोजी (सकाळी११.वा) देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कुलदीप जंगम साहेब यांच्या हस्ते होणार आहे .यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लातूर येथील राजर्षी शाहूमहाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुरेश वाघमारे , देगलूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ उपस्थित राहणार आहेत.
तरी विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन उपप्राचार्य प्रा उत्तम कुमार कांबळे यांनी केले आहे.