नांदेड जिल्ह्यासाठी १५-१६ ऑगस्ट रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा.

हवामान खात्याने दिला ‘यलो अलर्ट’; जिल्हा प्रशासनाचा इशारा

 

नांदेड प्रतिनिधी,दि.१३:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.३५ वाजता दिलेल्या अंदाजानुसार, नांदेड जिल्ह्यासाठी १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.

 

 

 

१२, १३ व १४ ऑगस्ट : तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि हलका ते मध्यम पाऊस.

 

 

१५ व १६ ऑगस्ट : तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

 

 

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 

काळजी घेण्यासाठी सूचना :

वादळी वारे किंवा मुसळधार पाऊस सुरू असताना घराबाहेर जाणे टाळा.

विजांचा कडकडाट सुरू असताना मोकळ्या जागेत उभे राहू नका.

विद्युत उपकरणांचा वापर टाळा.

नाले, पूल किंवा पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी जाणे टाळा.