नांदेड दि. 15 ऑगस्ट :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचेमार्फत सकाळी 7.45 वा. तिरंगा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा मार्ग जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा वसतिगृह इमारत येथून सुरुवात होवून कुसुम सभागृह (आयटीएम कॉलेज) आयटीआय चौक मार्गे शिवाजीनगर ज्योती टॉकीज रोड, क्रीडा वसतिगृह स्टेडीयम मुख्य कमान जवळ समारोप करण्यात आला.
या हर घर तिरंगा अभियान मॅरेथॉन रॅलीस नांदेड जिल्हयातील खेळाडू मुले-मुली, प्रशिक्षक, मार्गदर्शक, नागरीक इतर कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दल कॅम्पचे अधिकारी कर्मचारी, एकनाथ पाटील अकॅडमीचे पोलीस प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक वैभव दमकोंडवार आदी उपस्थित होते. सदर रॅली उत्साहात संपन्न झाली.
भारतीय स्वातंत्राच्या 79 स्वातंत्र दिनानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. या उददेशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी मागील दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही 2 ते 15 ऑगस्ट या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सामूहिक बांधिलकीचे मूर्त स्वरुप असलेल्या व देशभक्तीची भावना जागृत राहण्यासाठी हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) अभियान 2025 राबविण्यात येत आहे.
ही रॅली यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन चंद्रप्रकाश होनवडजकर, तालुका क्रीडा अधिकारी विजय काकडे, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, क्रीडा अधिकारी डॉ. राहुल श्रीरामवार, विपुल दापके, कनिष्ठ लिपीक दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदिनी यशस्वी करण्यास सहकार्य केले.