ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित.

अभिनेत्री डॉ. गायत्री रामटेके यांच्या हस्ते सपत्नीक व सहकुटुंब गौरव.

नांदेड प्रतिनिधी : महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक यांच्या वतीने उमरी (ता. उमरी, जि. नांदेड) येथील अहिल्याबाई होळकर सभागृहात २२ ऑक्टोबर रोजी आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार बजरंगसिंह हजारी यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. प्रसिद्ध सिनेकलावंत डॉ. गायत्री रामटेके (मी रमाई बोलते फेम) यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

बजरंगसिंह हजारी हे दैनिक तरुण भारत तसेच दैनिक श्रमिक लोकराज्यचे माहूर तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडत जनहिताच्या विषयांना प्रसिद्धी देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

 

या सोहळ्यात बजरंगसिंह हजारी यांचा सपत्नीक व सहकुटुंब सन्मान करण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या गौरवामुळे पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कार्याला विशेष प्रोत्साहन मिळाले.

 

 

महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त बजरंगसिंह हजारी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.