छायाचित्रात देगलूरचे कर्तव्यदक्ष नायब तहसीलदार श्री मिठेवाड कर्मचारी वीरेशअप्पा, शिधापुरवठा धारक अमृतवार, दैनिक महासागर चे पत्रकार सतीश पाटील क्यादारे, दिसत आहेत.
आनंदाचा शिधा ऑफलाईन पद्धतीने वाटप करण्याचे आदेश दिल्यानंतर शिधाधारकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते.
देगलूर प्रतिनिधी, दि. २३:- देगलूर मध्ये अनेक अडचणीचा सामना करत अखेर काल आनंदाचा शिधा दाखल झाला महाराष्ट्र सरकारने आनंदाचा शिधा नागरिकापर्यंत देण्याचे जाहीर केल्यानंतर देगलूर मध्ये आनंदाच्या शिधावरून अनेक माध्यमातून टीका टिप्पणी करण्यात आली पण पुरवठा अधिकाऱ्याने या सर्व गोष्टीला तोंड देत आनंदाचा शिधा प्रत्येकाला मिळणारच असे आश्वासन दिले त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा मिळाला.
हा आनंदाचा शिधा मिळवण्यासाठी आज सकाळपासूनच शहरातील प्रत्येक दुकानात शिधापत्रिका धारकांनी एकच गर्दी केली दुकानदार ही शिधा वाटण्यासाठी सज्ज होते पण अचानक मशीन मध्ये तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे व सर्वरचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे शिधाधारकांना आनंदाचा शिधा मिळण्यास अडचणी येत होत्या.
त्यामुळे काही लोकांनी आरडाओरड सुरू केली व हा सुद्धा आपल्यापर्यंत मिळेल की नाही अशी त्यांना शंका वाटत होती व सकाळपासूनच लोकांनी पुरवठा अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रारी सुरू केल्या पण अनेकदा सर्वर येत जात असल्यामुळे का थोड्या वेळानंतर शिधा मिळेल असे आश्वासन देऊ लागले पण दुपारपर्यंत हीच परिस्थिती एकूण दुकानावर सुरू होती देगलूरचे कर्तव्यदक्ष पुरवठा अधिकारी व नायब तहसीलदार श्री मिठेवाड साहेब यांनी साप्ताहिक सुट्टी असताना देखील तात्काळ शिधावाटप केंद्रावर भेट देऊन ऑफलाइन पद्धतीने रजिस्टर वर शिधाधारकांच्या सह्या अंगठे व नाव नोंदणी नोंदवून त्यांना आनंदाचा शिधा देण्याचे आदेश दिले.
या आदेशाचे पालन करत प्रत्येक केंद्रावर ऑफलाइन पद्धतीने शिधावाटप चालू केले आहे पण काही केंद्रावर याबाबत विचारणा केली असता आम्हाला आणखी लेखी मिळाली नसल्यामुळे यामध्ये अडचणी येथील असे सांगितले.
ऐन दिवाळीच्या सुट्ट्या व रविवारची सुट्टी अशी संमिश्र सुट्टी असताना देखील कर्तव्यदक्ष नायक तहसीलदार यांनी नागरिकांसाठी सुट्टीच्या दिवशी देखील तात्काळ धाव घेऊन आनंदाचा शिधा वाटप करण्यामध्ये जे सहकार्य केले त्याबद्दल नागरिकांमध्ये त्यांचे चर्चा होत आहे.