देगलूर आगारावर बेशिस्त अधिकाऱ्यांचे वर्चस्व

(शहापूर माधव पाटील शहापूरकर) दि :-२४ :-  देगलूर आगारातील सावळा गोंधळ प्रकरणी पत्रकारांनी 16 सप्टेंबर रोजी नुकतेच निवेदन सर्व संबंधीत विभागास दिले. तरी पण आगारातील बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्या त्या पदावरुन अद्यापही हटविण्यात आले नाही परिणामी आगारातील बेशिस्त अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांनाही आपल्या गैरकत्याबद्दल अजिंबात तमा त्यांना वाटत नाही.

 

ही वस्तू स्थिती त्यांच्या बाबत दिसून येत आहे. स्थानीक आगारात १७ सप्टेंबर रोजी अमर पाटील हे नव्याने रुजू झाले आहेत. त्यांनी पदभार स्वीकारून तब्बल महिना भराचा कालावधी संपला आहे. असे असतांनाही बेशिस्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तयामध्ये फेरबद्दल करण्यास जाणीवपूर्वक टाळा-टाळ करीत आहेत.

 

तर पत्रकारांनी याबाबत विचार पुस केल्यास ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. तर दुसरीकडे मात्र आगारातील एका संघटनेच्या कर्मचाऱ्यांना नविन
बसस्थानकातील वाहतूक नियंत्रण कक्षातील डिवटी व इंधल डिवटी सह आदिप्रमुख विभागातील डिवट्या आवर्जून सोपवीत आहेत.

 

याच संघटनेच्या प्रमुखास मालचाहतूक विभागातून बदलण्याचे धाडस अद्यापही आगार प्रमुख दाखवित नाहीत. या प्रकरणी ते टाळा-टाळची भुमिका घेत आहेत. परिणामी मालवाहतूकविभागातील बेशिस्त कर्मचारी आगारात स्वतःला डॉन समजत आहे. व मालवाहतूक विभागात पुनश्चः चालक, वाहक वर्ग अकारण बसत आहेत. व प्रदीर्घ कालावधीपर्यंत गप्पा मारत असल्यामुळे या विभागात सावळा गोंधळ होत आहे.

 

या गोंधळाकडेही आगारप्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. या पाठोपाठा सहाय्यक
वाहातूक निरीक्षक ठाकूर हे 8 ऑक्टोंबर रोजी मद्य सेवन करून बसस्थानकातील कर्मचारी निवासात कुंभकर्णी झोपेच्या अवस्थेत होते.

 

त्यांना दुपारच्या सत्रातील ११.२५ या वेळात एका कर्मचाऱ्यांनी ठाकूर यांना झोपेतून जागे करून, त्यांना आगार प्रमुखासमोर हजर केले. तेंव्हाच ते शुद्धीवर आल्याचे दिसून आले. या व्यतिरीक्त १७ व १९ ऑक्टोंबर रोजी पण ठाकूर हे बसस्थानक प्रमुखांच्या कार्यालयात सकाळी ७.१० पर्यंत कुंभकर्णी झोपेतच व्यस्त असल्याचे दिसून आले. यावेळी ही त्यांना चालक वाहक कर्मचाऱ्यांनी जागे केल्याचे दिसून आले.

दि.२१ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महसूल वाढीसाठी राज्य परिवहन मंडळाचे अधिकारी वर्ग युद्ध पातळीवर दक्षता घेत असतांनाच स्थानिक आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक ठाकूर हे मात्र वारंवार निद्रादिन अवस्थेत दिसून येत असतात. तरी पण अशा बेशिस्त अधिकाऱ्यांची सहाय्यक वाहातूक या पदावरून कार्यमुक्त करण्यात येत नाही.

तथापी अशा दोषी अधिकाऱ्यांना नियमबाह्य रित्या आगारप्रमुखांनी अभय देणे योग्य काय आगारप्रमुखाकडून वारंवार अनुकूल प्रतिसाद मिळत असल्याचे पाहता ठाकूर यांचे मनोधैर्य आगारात वाढल्याचे दिसून येत आहे. हेच सहाय्यक वाहातूक निरीक्षक ठाकूर जे कर्मचारी तिकीटामध्ये गैरप्रकार केले आहेत.

 

अशा वाहक कर्मचाऱ्यास राज्य परिवहन मंडळाकडून मागे तडकाफडकी निलंबित करण्यात आले होते. तरी पण अशा दोषी वाहक कर्मचाऱ्यांना ठाकूर हे आगारातील एका टोळप्रमुखांच्या इच्छे खातरच देगलूर ते औराद या मार्गावरील दि. १७ व १९  ऑक्टोंबर या रोजी व यापुर्वीच्या कालावधीत ही आवर्जून डिवटी दिल्याचे दिसून आले. दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी ठेऊन त्यांना राजरोज पणे औराद मार्गावरील डिवट्या ठाकूर यांनी देत आहेत.

 

 

 

 

 

 

त्याच्या या मनमानी निर्णयाबाबत ठाकूर यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याऐवजी या गैरप्रकाराकडे आगार प्रमुखांनी बघण्याची भुमिका घेणे योग्य काय तुर्त आगारात आगार प्रमुखांचे बेशिस्त अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अजिबात नियंत्रण दिसून येत नाही. उलट आगारातील विविध संघटनातील डॉन महाशयाचे नियंत्रण आगार प्रमुखावर दिसून येत असल्याबद्दल सर्वत्र आर्श्चय व्यक्त करण्यात येत
आहे. ऐन दिपावलीच्या कालावधीत प्रवाशांची आवक-जावक मोठया प्रमाणात असते. महसूल वाढीकडे राज्य परिवहन महामंडळाने आपले लक्ष केंद्रीत केले आहे, तरीपण स्थानीक आगारातील सहाय्यक वाहतूक निरीक्षक ठाकूर यांचे कार्य मात्र दिनजाव तनका आव या प्रतिक्षेत ते बिजी दिसून येत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *