देगलूर /(गजानन बिडकर)
सध्या देगलूर शहरांमध्ये भारत जोडो यात्रेची जोरदार चर्चा सुरू आहे तसेच प्रशासनाकडून व काँग्रेस पक्षाकडून जय्यत तयारी देखील सुरू आहे यासाठी स्वतः माजी पालकमंत्री तथा खासदार श्री अशोकराव चव्हाण साहेब,व देगलूर चे युवा आमदार जितेश अंतापुरकर हे देखील परिश्रम घेत आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा देगलूर हून जाणार असे निश्चित झाल्यापासूनच काँग्रेस पक्षाकडून या यात्रेसाठी जाहिरात तयारी सुरू करण्यात आली आहे व प्रशासनाकडून देखील यासाठी जोरात काम सुरू झाले आहे.
विशेष करून पोलीस प्रशासन नगरपरिषद प्रशासन कंबर कसून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटत आहे नगरपालिका स्वच्छता विभाग, सार्वजनिक जि प सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन यांचे विशेष कार्य व सहभाग यात आहे. तसेच काँग्रेसचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर देखील ही यात्रा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत आहेत.
यात गावोगावी व सर्कल मध्ये बैठका घेणे, कार्यकर्त्यांना जमवणे, प्रत्येक कार्यकर्त्याला त्याची जबाबदारी सोपवणे असे कार्य हाती घेतले आहे त्यासाठी प्रत्येक सर्कल मध्ये गावागावांमध्ये स्वतः जाऊन आढावा बैठक घेऊन ते कार्यकर्त्याला त्यांचे कर्तव्य समजावत आहेत.
भारत जोडो यात्रा ही येत्या ७/११/२२ रोजी महाराष्ट्रात देगलुर येथे दाखल होणार आहे. व ८/११/२२ रोजी सकाळी ५:३० वा देगलुर शहरातुन यात्रेला सुरुवात होणार आहे.
याच निमित्ताने काल देगलुर तालुक्यातील तडखेल येथे आढावा बैठक पार पडली. गाव निहाय गावातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जनजागृती करुन यात्रेत जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी सांगितले यावेळी जि.प.शिक्षण व क्रीडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर व सर्व गावचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.