वाशिम दि.२२ :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिमच्या वतीने काल २१ नोव्हेंबर रोजी मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालयात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पुणेच्या वतीने एक दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री.गावंडे होते.मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक राजेश यावले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत,सहायक पोलीस निरीक्षक श्री कमलसिंह निनामा,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी सहदेव डोंगरे व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते.
या प्रशिक्षणाला कार्यक्रमाला मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक,तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी,प्राध्यापक, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.