अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा, किनवटची वार्षिक सर्वसाधारण सभा लवकरच

 

किनवट प्रतिनिधी,दि.०१:- अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद तालुका शाखा, किनवटची वार्षिक सर्वसाधारण सभा व नविन कार्यकारणी निवडीसाठी लवकरच बैठक घेतली जाणार आहे.

या बैठकीत सदस्यांना सहभाग घेण्यासाठी आपले दैनिक व साप्ताहीकात प्रकाशीत झालेले या वर्षातील बातमी व आपल्या वृत्तपत्रातील ओळखपत्र व सदस्य् नोंदणीचे पावती बंधनकारक असुन त्या प्रतिनिधींचे वर्तमान पञ शहरात किंवा तालुक्यात येत असले पाहीजे   सर्व सभासदांनी वरिल अटीची पुर्तता १५ डिसेंबरच्या आत करावी असे अहवान तालुका पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

 

 

नविन वर्षाची सभासद फिस नविन सदस्यांना ५०० रूपये व जुन्या सभासदांना ४०० रूपये असून आपले वृत्तपत्र् व साप्ताहीक त्यामध्ये आपली बातमी प्रकाशीत झालेले व ओळखपत्र कोअर कमिटीचे सदस्य् किंवा प्रसिध्दी प्रमुख कचरू जोशी यांच्याकडे जमा करावी. याशिवाय होणाऱ्या निवडणुक प्रक्रीयेत पत्रकार बांधवांना सहभाग घेता येणार नाही. पत्रकार संघाच्या निवडणुका लोकशाही पध्दतीने घेतल्या जाणार आहेत.

 

 

या निवडणुक प्रक्रीयेसाठी नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. सदर निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात होण्यासाठी सर्व सन्माननिय सदस्यांनी सहकार्य करावे. अशी विनंती अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद किनवटचे अध्यक्ष सुधाकर कदम, सचिव प्रकाश कार्लेवाड यांनी केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *