देगलुर प्रतिनिधी,दि.२२:- देशातील अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे या उद्देशाने १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतीय अल्पसंख्यांक ज्यामध्ये मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध व पारसी यांचा सामाजिक,आर्थिक, राजकीय, व शैक्षणिक दर्जा राखला जावा या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
लेंडी प्रधान प्रकल्पात बुडीत क्षेत्रात गेलेल्या ११ गावांपैकी खानापूर जवळ रावणगाव या गावाचे पुनर्वसन झाले आहे.
पुनर्वसनात आल्यानंतर परिवर्तन अकॅडमी व महमदिया अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक हक्क दिन प्रथमतः साजरा करण्यात आला.व तसेच अल्पसंख्यांक हक्क दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.
वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचेही कार्यक्रम याद्वारे पार पाडण्यात आले. अत्यंत हर्षउल्हासात हा कार्यक्रम पार पडला. विविध क्षेत्रातील मान्यवर अतिथी म्हणून कार्यक्रमास हजर राहून उपयुक्त असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे मुखेड तालुकाध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून रावणगाव चे सरपंच प्रतिनिधी अशोकराव रावणगावकर,शेतकरी नेते कैलास येसगे, शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर, इसाक तांबोळी, रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते शादुल पटेल, अशोकराव कुलकर्णी, बाबू आप्पा नुच्चे,जलील पटेल, शाकीर पटेल,
ग्रामविकास अधिकारी पवळे, मुख्याध्यापक तुकाराम पाटील, इलियास पटेल अजमेर पटेल, अहेमद पटेल, गंगाधर पाटील, शेख मैनोद्दिन, महबूब शेख, शिवानंद नुच्चे,मस्तान शहा,गणपती मामा, इब्राहिम घुडूसाब, रघुनाथ, सय्यद भाई धर्माजी, धोंडीबा यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अजिस पटेल, लायक पटेल, दस्तगीर पटेल, बाबुभाई,अहमद भाई, रफिक तांबोळी, रामेश्वर येरेवाड, यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरशाद पटेल यांनी केले तर आभार प्रदर्शन सुलेमान भाई यांनी केले.