नांदेड पोलीस दलातील पोलीस अधिकारी, कार्यालयीन अधिक्षक व पोलीस अंमलदार सेवानिवृत्त

नांदेड प्रतिनिधी,दि.०१ :- नांदेड पोलीस दलातील एक पोलीस निरीक्षक, एक कार्यालयीन अधिक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक दोन सपोउपनि व तीन पोलीस अंमलदार यांचा नियत वयोमानानुसार दिनांक ३१.१२.२०२२ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी नांदेड, दिनेश सोनस्कर, सपोनि नियंत्रण कक्ष अधिकारी यांचे हस्ते काल दिनांक ३१ /१२/२०२२ रोजी सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवून सत्कार करण्यात आला.

सदर सेवानिवृत्त समारंभ मंचन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय नांदेड येथे पार पडला. सर्व सेवानिवृत्तांनी आता आपल्या कुटूंबाकडे लक्ष द्यावे व सुखी समाधानाने आनंदी जिवन जगन्याचा सल्ला दिला. सदर सेवानिवृत्त समारंभास मसपोनि कमल शिंदे, पोलीस कल्याण विभाग नांदेड, इंतर शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार कर्मचारी मोठया संख्येने हजर होते.

 

 

 

 

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विठ्ठल कत्ते यांनी केले असून, मपोकों राखी कसबे पोलीस कल्याण यांनी कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले. पोलीस निरीक्षक भगवान दत्तात्रय कापकर पोलीस नियंत्रण कक्ष नांदेड, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत सूर्यभान जाधव पो. अ. का. नांदेड, पोउपनि एकनाथ गेंदजी देवके, पोस्टे विमानतळ पोउपनि प्रकाश माधवराव सांगळे, नांदेड शहर वाहतुक शाखा पोउपनि विश्वनाथ रामराव केंद्र, पोस्टे कंधार पोउपनि मोहम्मद

 

 

 

 

मौलाना सय्यद, पो. नियंत्रण कक्ष नांदेड सपोउपनि घनश्याम उत्तम चव्हाण, पोस्टे इतवारा पोस्टे मुदखेड सपोउपनि राशिदखान मुर्तजाखान पठाण, पोहेकॉ / १४८१  नारायण वामन सूर्यवंशी,पोलीस मुख्यालय नांदेड पोहेकॉ / १९४५ शामराव रामराव सुर्यतळ,पोलीस मुख्यालय नांदेड पोहेकॉ / १९१७ शेख मुबारक शेख मेहबुबसाहाब पोस्टे कंधार असे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *