नाशिक पदवीधर मतदारसंघ; सत्यजित तांबे 68 हजार 999 मतांनी विजयी

 

 

नाशिक प्रतिनिधी, दि.०४ :-  नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे  यांनी श्री. तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

 

विभागीय आयुक्त श्री गमे यांनी पहिल्या पसंतीच्या ०१ लाख २९ हजार ६१५ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती  दिली. विजयी  उमेदवारासाठी ५८ हजार ३१० मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली.त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्‍त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

 

मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने श्री गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.

 

 

 

 

यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण् डी., जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव

 

 

 

तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी  पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *