देगलूर प्रतिनिधी,दि.०९ :- देगलूर येथे काल माधव गोविंद मंगल कार्यालय विश्व परिवारा द्वारे शेतकरी, महिला बचत गट महा मेळावा व रोजगार मार्ग दर्शन शिबिर ऊल्हासात संपन्न झाले .कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुनील जाधव यांनी सत्यम शिवम सुंदरम गीत गाऊन झाली.
यावेळी श्री सिद्ध दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, जिल्हाधिकारी अभिजीत जी राऊत , सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख, जिल्हा अधीक्षक क्रुषि अधिकारी नांदेड रवि शंकर चल्वदे यांनी मार्गदर्शन केले .शेतकरी हा देशाचा पोशीण्दा क्रुषिप्रधान अर्थ व्यवस्थेचा कणा आहे त्याला येणाऱ्या समस्या , ऊपाय योजना,अर्थ सहाय्य, नैसर्गिक आपत्ती वरील ऊपाय, उत्पन्न वाढ, हवामान बदल, अंदाज, रोजगार व्रुद्धि चे ऊपाय मार्गदर्शन महिला बचत गट व्रुद्धी या बद्द्ल सर्व प्रकारे चर्चा, मार्गदर्शन , मदत , ऊपाय योजना या शिबिरात प्रमुख वक्त्यानी या वर चर्चा द्वारे ऊपाय मार्गदर्शन केली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कैलास येसगे कावळगावकर यांनी केले .यावेळी शून्यातून उद्योग विश्व निर्माण करणारे दत्तात्रय पा. इंगळे, बालाजी इबितदार, मारोती वजीरे, भानुदास पेंडकर, शिवकुमार गाजले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्पक कैलास येसगे, डॉ. सुनील जाधव, शिवकुमार जाधव, निखील पा. ठाणेकर, दिलीप पाटील, किरण थड्के, गजानन पाटील, अजय शिवपुजे, दिपक रेड्डि, सतीश वंटे, नरेश राचलवार, माधव लगडे, राजेंद्र बाचेगावे, आम्रपाली येसगे, रेणुका राजुरे आदी नी कार्यक्रम यशस्वी केला.
या वेळी श्री सिध्द दयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर , जिल्हाधिकारी अभिजित राऊत ,उप जिल्हाधिकारी सचिनजी गिरी , सुप्रसिध्द हवामान अभ्यासक पंजाबराव डख , क्रुषि अधीक्षक रवि शंकर चल्वदे ,जिल्हा विकास प्रबंधक नाबार्ड दिलीप दमय्यावार , जिल्हा माहीती अधिकारी विनोद रापतवार , जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक प्रवीण खड्के , किरण चांदोरकर,गजानन पातेवार,मुख्याधिकारी
गंगाधरजी इरलोड, तालुका क्रुषि अधिकारी गिरी सोमेश्वर, नायब तहसीलदार मिठेवाड सर, पन्गे सर,नागनाथ जी वाडेकर’,खंडागळे सर, अविनाश नीलमवार, बालाजी थड्के, प्रशांत पाटील, दिगंबर कौरवार, अविनाश जी कोट्गिरे, संजय कांबळे, दिलीप सुगावे, जेजेराव शिंदे, राजु पाटील मलकापूर, गजानन पाटील, नारायण वड्जे, उत्तम वाडीकर व सर्व पक्षाचे, समाजाचे, संघटनांचे पदाधिकारी शेतकरी, बचत गट महिला पदाधिकारी,डॉक्टर्स, पत्रकार, शिक्षक, वकील, प्रशासकीय अधिकारी, महिला भगिनी , सर्व समाज बांधव आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते .