हैदराबाद प्रतिनिधी,दि.१६:- जी.एच.एम.सी. तर्फे काल रामअंतापुर परिसरात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जी.एच.एम.सीकर्मचाऱ्यांनी नागरिकांना प्रेरित केले यात प्रामुख्याने कचरा रोडवर न टाकता तो एका जागी गोळा करून कचरा गाडीतच टाकावा यासाठी ते आग्रही होते, काही नागरिक रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या वेळी गल्लीतील एका कोपऱ्यावर कचरा टाकतात त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरते व नागरिकाचे आरोग्य देखील यामुळे धोक्यात येते.
त्यामुळे कचरा रस्त्यावर न टाकता तो कचऱ्याच्या गाडीतच टाकावा असे नागरिकास त्यांनी आवाहन केले आहे. या अभियानात जी.एच.एम. सी. चे आरोग्य विभागातील कर्मचारी सफाई कर्मचारी रस्ते सफाई महिला कर्मचारी आदी उपस्थित होते.