हैदराबाद प्रतिनिधी,दि.१६ :- दर वर्षी प्रमाणे यंदाही १९ तारखेला (शिव जयंती २०२३) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज मराठा नवयुवक मंडळ व विविध मंडळातील कार्यकर्ते व शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी यांच्या सहकार्याने भव्य शोभा यात्रा काढण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणुकीत अनेक तरुण विविध भजन मंडळातील महिला, लोक उत्साहाने सहभागी होतात.
ही मिरवणूक शिवद्वार (जुन्या पुलाचे गेट) येथून दुपारी एक वाजता निघून गांधी पुतळा, वीरांगना अवंतीबाई पुतळा, जुमेरात बाजार, चुडीबाजार, बेगम बाजार, भांडी बाजार, सिद्देंबर बाजार, बडेमिया पेट्रोल पंप, शिवाजी महाराज पुतळा, शिवाजी ब्रिज मार्गे मार्गस्थ होईल. इम्लिबन पार्क, MGBS समोर, शिवाजी पार्क येथे या मिरवणुकीचे जाहीर सभेत रूपांतर होईल. तरी या कार्यक्रमात अधिकाधिक देशभक्त व शिवप्रेमींनी मिरवणुकीत सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन मराठा समाजा कडून करण्यात आले आहे.
जाहीर सभा झाल्यावर अन्नप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्थानिक प्रवर्गांना व इतर संस्थांना या कार्यक्रमांची व स्थानिक कार्यक्रमांची माहिती द्यावी. व हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे समाजाच्या ऐतिहासिक मिरवणुकीत सहभागी होऊन संस्थेच्या व शोभायात्रेला वैभवात भर घालावी. असे आवाहन या वेळी करण्यात आले.