देगलूर प्रतिनिधी,दि.१७ :- अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील मराठी , हिंदी व इंग्रजी विभाग व स्वा. रा. ती म विद्यापीठ नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “साहित्य, समाज आणि संस्कृती “ या विषयावर दि. २ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
प्रस्तुत चर्चासत्रासाठी देशातील विविध विद्यापीठ व महाविद्यालयातील प्राध्यापक व संशोधक यांच्या कड़ून शोधनिबंध मागविन्यात येत आहेत. चर्चासत्रासाठी जास्तित जास्त प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यानी शोधनिबंध पाठवून नाव नोंदनी करावी असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन ख़ताळ व संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.