जगावेगळ्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड गिनीज बुक मध्ये शिफारस करणार ; श्रीकृष्ण कोकाटे

 

 

नांदेड प्रतिनिधी,दि.१७ :- नांदेड शहरात कोविड लसीकरण सुरू झाल्यापासून मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वाटपाचा धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांचा ७०१ दिवसापासून अखंडीत सुरु असलेल्या जगावेगळ्या उपक्रमाची नोंद वर्ल्ड गिनीज बुक मध्ये व्हावी यासाठी शिफारस करणार असल्याचे प्रतिपादन सेवा जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केले.


श्री गुरुगोविंदसिंघजी स्मारक शासकीय रुग्णालय येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हा अध्यक्ष प्रवीण साले हे होते.व्यासपीठावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. संतोष शिर्शीकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोराडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हावगीराव साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला संयोजक दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रम घेण्यामागची भूमिका आपल्या प्रास्ताविकातून स्पष्ट करून जोपर्यंत लसीकरण सुरु राहील तो पर्यंत ही सेवा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केले.

 

 

 

 

 

 

प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून असे सांगितले की, दिलीप ठाकूर यांच्या अविरत सेवा कार्यामुळे भाजपाची जनमाणसातील प्रतिमा आणखी उंचावत आहे.डॉ. भोसीकर यांनी आपल्या भाषणातून ॲड. ठाकूर यांच्या प्रोत्साहनामुळे नांदेड मध्ये विक्रमी लसीकरण झाल्यामुळे त्यांचे तोंडभरून कौतुक केले.७०१ दिवस पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कामाजी सरोदे, प्रशांत पळसकर, विलास वाडेकर, महेंद्र शिंदे,कृपालसिंघ हुजूरिया,अरुणकुमार काबरा,सुरेश शर्मा, सविता काबरा,सुरेश निल्लावार, विजय वाडेकर, सुरेश लोट यांचा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

 

 

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लस घेणाऱ्या नागरिकासमवेत मोठया संख्येने उपस्थित असलेल्या इतर रुग्णांना देखील मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल व बिस्कीट वितरित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत पळसकर यांनी तर कामाजी सरोदे यांनी आभार मानले.

 

 

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसेविका अनिता नारवाड,शांतीकुमार देगावकर, प्रभुदास वाडेकर, संतोष भारती, चंद्रभान कंधारे, माधव शिंदे,सुनिता मचल,अंजना मंदावाड,शंकर गिरडे, माया पोपळवाड यांनी परिश्रम घेतले. एखाद्या राजकीय पक्षाने एका आठवड्यासाठी दिलेला कार्यक्रम सलग ७०१ दिवस अखंडित सुरू ठेवण्याचा विक्रम दिलीप ठाकूर यांनी केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

( छाया: करणसिंग बैस, सचिन डोंगळीकर, संघरत्न पवार )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *