देगलूर प्रतिनिधी,दि.२८ :- देगलुर येथे दिनांक २६ रोजी संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजे पर्यन्त शिव जयंती निमित्त प्रसिद्ध शिव व्याख्याते निलेशजी जगताप यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यांनी शिवराय हॆ सर्व समाजाला , शेतकऱ्याला घेऊन जगातील सर्वोच्च संस्कार असलेले रयतेच्या कल्याणासाठी झटनारे, सर्वोच्च अर्थ व्यवस्था निर्माण करणारे छत्रपती राजे कसे होते हॆ खुपच छान पणे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिव पुजन होउन डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना व दैवत छत्रपती गीत गाऊन लाडक्या शिवरायांना मानवंदना दिली .नामदेव थड्के भाजपा तालुका उपाध्यक्ष आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिकेत पाटील राजूरकर सभापती मार्केट कमिटी होते.
प्रास्ताविक जीवन पाटील यांनी तर सूत्र संचालन तानाजी हिंगोले यांनी केले तर आभार नामदेव थड्के यांनी मानले .सर्व समाज व संघटना , पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचा सन्मान करण्यात आला . किरण बिरादार यांनी ही आपले विचार मांडले . संध्याकाळी साडेचार ते सात वाजे पर्यन्त मुला मुलींची भाषण स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा , गीत गायन स्पर्धा भालेराव ताई व डॉ . सुनील जाधव यांनी पार पाडली यात मोठय़ा संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
सर्व स्पर्धा विजेत्यांना बक्षीस देण्यात आले . मुला मुलींचा सहभाग कौतुकास्पद होता म्हणुन इन्साफ की डगर पे बचौ दिखाओ चल्के ये देश है तुम्हारा नेता तुम्हीं हो कल के गीत गाऊन डॉ.सुनील जाधव यांनी गाऊन त्यांचा सन्मान केला .या उत्सवात अनिकेत पाटील राजुरकर सभापती मार्केट कमिटी , जीवन पाटील , नामदेव थड्के भाजपा तालुका उप अध्यक्ष , डॉ. सुनील जाधव , रमेश जाधव कर सल्लागार
,दिलीप सुगावे सर , बालाजी पाटील सांगवीकर , तुकाराम पाटील , गजानन पाटील नागराळकर , जेजेराव शिंदे करड्खेड वाडी , गजानन पाटील मूजल्गेकर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष , राजु पाटील मलकापूर कर , नारायण वड्जे , , उमाकांत भुताले , बालाजी थड्के देगावकर , अनिल बोनलावार , गोटु पाटील बिल्लाली कर , शिव सेनेचे महेश पाटील , धनाजी जोशी , संजय जोशी , पांडुरंग पाटील देगाव कर , संतोष जाधव भुतनि हीपरगा , भागवत पाटील ,व दत्तात्रय जानते , बालाजी जाधव , सुनील यशमवार , किरण बिरादार , प्रशांत पाटील आचेगाव कर , रूपेश पाटील
भोकसखेडकर , क्रुष्णा यन्नलवार , राहुल थड्के , किशन थड्के , सुनील थड्के , सुमंत थड्के , नवनाथ पाटील नागराळकर , देविदास थड्के , बालाजी पाटील कुशवाडीकर , मु . अ दशरथ पांचाळ , भालेराव ताई , तानाजी पाटील हीण्गोले , विजय मेह्त्रे , मानाजी थड्के , गणपत थड्के , पांडुरंग डुकरे , माधव गुर्मुड्वार , बालाजी वजिरे , नीळकंठ चिन्चोले , गजानन शिंदे , अमोल पान्हारे , गोविन्द बट्टवार , लक्ष्मण थड्के सह गावांतील महिला , पुरुष , युवा तरुण मोठ्यां संख्येने उपस्थित होते .